विदर्भ लाईव्हचा दणका! बातमीचा इम्पॅक्ट, गजानन टॉकीज रोडवरील खड्ड्यावर प्रशासनाचा तातडीचा धापा

 

मलकापूर : – शहरातील नागरी समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला अखेर विदर्भ लाईव्हच्या वृत्ताने जाग आणली आहे. मलकापूर शहरातील गजानन टॉकीज रोडवरील जीवघेण्या खड्ड्याबाबत विदर्भ लाईव्हने केलेल्या सडेतोड बातमीचा तात्काळ इम्पॅक्ट दिसून आला असून, प्रशासनाच्या वतीने संबंधित खड्ड्यावर धापा टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या कारवाईमुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. दररोज वाहनचालकांना अडचणीत टाकणारा आणि अपघाताला आमंत्रण देणारा हा खड्डा विदर्भ लाईव्हने ठळकपणे मांडल्यानंतर अवघ्या दोन दिवसात प्रशासन हालचालीत आले. रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या या खड्ड्यामुळे वाहतूक कोंडी, वाहनांचे नुकसान आणि जीवितास धोका निर्माण होत असल्याचे वास्तव बातमीद्वारे समोर आणण्यात आले होते. बातमी प्रसिद्ध होताच नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले असून, अपघात होण्याआधीच कारवाई झाली, हीच अपेक्षा होती, अशी प्रतिक्रिया अनेक वाहनचालकांनी दिली आहे. विशेषतः या मार्गावरून जाणाऱ्या व्यापारी, विद्यार्थी आणि महिला वर्गाने विदर्भ लाईव्हच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. संबंधित ठिकाणी प्रशासनाकडून त खड्डा बुजवण्यात आला असून, वाहतूक सुरळीत झाली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना भेडसावणारा त्रास काही प्रमाणात कमी झाला आहे. नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, प्रशासनाला जबाबदार धरणे आणि अपघात टाळणे हाच विदर्भ लाईव्हचा उद्देश आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की, प्रभावी आणि निर्भीड पत्रकारितेमुळेच व्यवस्थेत हालचाल होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!