धोबी समाजाच्या आरक्षणासाठी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन!

मलकापूर 🙁 विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) धोबी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरातून एकच मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रसंत गाडगे महाराज धोबी परीट सेवा मंडळ, मलकापूर शहर व तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. धोबी समाजावर आरक्षणाच्या बाबतीत होणारा अन्याय तातडीने दूर करून समाजाला न्याय द्यावा ही मागणी यावेळी करण्यात आली. हे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री यांना तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आले. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष अनिल तांदुळकर, उपाध्यक्ष गोपाल कावस्कार, सचिव अविनाश जामोदे, कोषाध्यक्ष भिकू भातुरकर, महासचिव उमेश जाधव, समाज सल्लागार अशोक रवणकार, प्रसिद्धीप्रमुख बळीराम बावस्कार, तसेच सुशील ठाकरे, प्रकाश दहिभाते, प्रकाश केणे, सोपान केणे, सतीश दहिभाते, निलेश रायपुरे, अर्जुन केणे, आकाश भातुरकर, योगेश सोनवणे, लहू कंडारकर, मुन्ना मांडोळे, संजू रवणकार, विजय राऊत, रामा सपकाळ, गौरव दहिभाते आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!