Headlines

वर्दी नसतानाही ड्युटीवर? – RCP पथकातील किशोर बीबेचा उद्धटपणा उघड! वर्दी नाही म्हणजे शिस्त भंगाची कारवाही झालीच पाहिजे; पो.नी. गणेश गिरी यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष; पाठीशी घालणार! की कारवाही करणार ?

मलकापूर ( दिपक इटणारे ) :- शहरातील पोलिसांच्या हलगर्जी व बेजबाबदार कारभाराचे नवे प्रकरण समोर आले आहे. काल रात्री ११ वाजेच्या सुमारास दोन गटांत वाद होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. या वादावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र सर्वात धक्कादायक बाब म्हणजे – या प्रकरणात नागरिकांशी अश्लील वर्तन करणारा पोलीस कर्मचारी B.N 338 किशोर बीबे (RCP पथक, मलकापूर) असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सर्वात गंभीर म्हणजे सदर पोलीस कर्मचारी वर्दीवर नसतानाही ड्युटीवर हजर होता! वर्दीशिवाय ड्युटी करणे हा स्पष्ट शिस्तभंग आहे आणि याच अवस्थेत त्याने नागरिकांना अत्यंत अश्लील, असभ्य शब्दांत शिवीगाळ केली. पोलिसांसारख्या शिस्तीच्या खात्यात ही गोष्ट अत्यंत गंभीर मानली जाते.

कायद्याचे उल्लंघन करणारा बेजबाबदार पोलीस कर्मचारी किशोर बिबे

या कर्मचाऱ्याने वर्दीवर नसताना सरकारी कामकाज करण्याचा अधिकार गृहित धरला. तसेच नागरिकांशी उद्धट, असभ्य आणि रागाने बोलून पोलिस खात्याची ‘जनतेचे मित्र’ असलेली प्रतिमा मलीन केली. याप्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नागरिक आणि पत्रकार संघटना या प्रकारावर तीव्र रोष व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे, घटनास्थळी उपस्थित पत्रकार दिपक इटणारे यांनीही या कर्मचाऱ्याला याच बाबतीत थेट जाब विचारला व संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. “जर अशाप्रकारे पोलीस वर्दीशिवाय ड्युटीवर नागरिकांशी असभ्य वर्तन करणार असतील, तर कायदा-सुव्यवस्थेचं रक्षण कोण करणार?” असा सवाल सध्या संपूर्ण शहरात विचारला जात आहे.
या कर्मचाऱ्याच्या बेजबाबदार, उद्दाम वर्तणुकीवर तात्काळ निलंबनाची कारवाई व्हावी, अशी नागरिकांची आणि पत्रकार बांधवांची ठाम मागणी आहे. अन्यथा अशा प्रकारचे पोलीस दलात वाढते बेकायदेशीर वर्तन गंभीर परिणाम घडवू शकते. पोलिस दलाची शिस्त व विश्वास टिकवण्यासाठी अशा कर्मचाऱ्यांवर कठोर पावले उचलणे गरजेचे आहे, अन्यथा जनतेचा पोलिसांवरील विश्वास डळमळीत होईल.
दरम्यान, बक्कल नंबर 338 किशोर बीबे, RCP पथक मलकापूर असे या अश्लील शिवीगाळ करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असल्याचे समोर आले आहे.

पोलीस कायद्यानुसार गंभीर गुन्हेगारी स्वरूपाचे उल्लंघन

1. Maharashtra Police Act 1951 (Sec 22, 23):
प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याने ड्युटीच्या वेळी पूर्ण गणवेश (वर्दी) परिधान करणे बंधनकारक आहे. वर्दीशिवाय कर्तव्य बजावणे हे शिस्तभंग आणि कायद्याचे थेट उल्लंघन आहे.

2. Police Manual Rule 169:
कोणत्याही पोलिस कर्मचाऱ्याला वर्दीशिवाय ड्युटी करण्यास केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लेखी आदेशानंतरच परवानगी असते. या घटनेत असे कोणतेही अधिकृत आदेश नव्हते.

3. Indian Penal Code (IPC) 170:
सरकारी नोकर असल्याचे भासवून अधिकार गृहित धरणे (Personating as Public Servant) हा गुन्हा आहे. त्यासाठी २ वर्षांपर्यंत कारावास किंवा दंडाची तरतूद आहे. वर्दीशिवाय ड्युटी व नागरिकांशी उद्धटपणा हा याच श्रेणीत बसतो.

4. Supreme Court आदेश (Prakash Singh Vs. Union of India):
पोलीस विभागातील अशा शिस्तभंगाच्या प्रकरणांवर ‘Zero Tolerance Policy’ अवलंबण्याचे निर्देश.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!