मलकापूर– पश्चिम विदर्भात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी दिला जाणारा राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद सन्मान कर्तृत्वाचा पुरस्कार २०२५ यंदा प्रा. मनीष मानकर यांना जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन मार्फत दिला जात असून, संस्थेच्या विकास आणि संशोधन समितीने त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची निवड केली आहे. या निवडीबद्दल प्रा. मानकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
सन्मान वितरण सोहळा येत्या जून २०२५ मध्ये अकोला जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार असून, याच कार्यक्रमात जिल्हास्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाबाबतची अधिकृत माहिती आणि सूचना लवकरच स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन तर्फे देण्यात येणार असल्याचे अध्यक्ष प्रा. राजेश पाटील ताले यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.
प्रा. मनीष मानकर सर यांना राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद सन्मान कर्तृत्वाचा पुरस्कार जाहीर
