मलकापूर :- शहरातील नंदनवन नगर येथे 9 मे रोजी सायंकाळी अंदाजे 8 वाजता दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे ही चोरी दिनदहाडे, लोकवस्तीत घडली असून, संबंधित घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नंदनवन नगर परिसरात दोन महिला घरासमोर उभ्या राहून परस्परांशी संवाद साधत असताना दोन अज्ञात चोरटे दुचाकीवरून तेथे पोहोचले. काही वेळ पर्यंत त्यांनी महिलांवर पाळत ठेवतच थांबले. दुचाकीवरील चोरट्याने दोन वेळा सोनसाखळी खेचण्याचा प्रयत्न केला, मात्र यश न आल्याने काही अंतरावर जाऊन ते पुन्हा परतले आणि गळ्यातील साखळी हिसकावून फरार झाले. पीडित महिलेनं आरडाओरड केल्यावर परिसरातील नागरिक जमा झाले, मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
गल्लीतही सुरक्षितता नाही! मलकापूरच्या नंदनवन नगरात सायंकाळच्या वेळेस महिलेला लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी सोनसाखळी हिसकावली; घटनेचा थरारक व्हिडीओ व्हायरल ?
