Headlines

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, मलकापूर तालुक्यातील दुधलगाव बु. येथील घटना!

मलकापूर :- तालुक्यातील दुधलगाव बुद्रुक शिवारात ८ फेब्रुवारीच्या रात्री १०:३० वाजताच्या सुमारास दुचाकीस्वाराचा भीषण अपघात झाला. अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत ४४ वर्षीय आनंद पांडुरंग ठोसर यांचा मृत्यू झाला. बारादरी (मलकापूर) येथील रहिवासी आनंद ठोसर हे दुचाकीवरून घरी परतत असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. नागरिकांनी तत्काळ त्यांना मलकापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना जळगाव येथील खान्देश रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच बारादरी भागातील नागरिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली. दरम्यान, मलकापूर ग्रामीण पोलिसांनी ९ फेब्रुवारीच्या पहाटे आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे. पुढील तपास अंमलदार रविकांत बावस्कर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!