Headlines

खामगाव-बाळापूर मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

खामगाव: अपघातांच्या वाढत्या घटनांमध्ये आणखी एक दुर्दैवी घटना आज (8 फेब्रुवारी) दुपारी घडली. बाळापूर-खामगाव महामार्गावर एका दुचाकीस्वाराचा भीषण अपघात झाला, ज्यामध्ये संतोष शर्मा (रा. अकोला) यांचा जागीच मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, संतोष शर्मा एमएच 28-बीएस 2240 या क्रमांकाच्या दुचाकीवरून प्रवास करत होते. अपघात कशामुळे झाला याची स्पष्ट माहिती मिळालेली नाही, परंतु त्यांच्या डोक्यावरून वाहन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

संतोष शर्मा हे शेगाव येथील स्व. दामोदर झाडोलीया यांचे जावई असल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!