Headlines

प्रजासत्ताक दिनाची परेड करून परतलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू, मलकापूर शहरातील घटना

 

मलकापूर : कर्तव्यावर असताना अचानक प्रकृती बिघडल्याने पोलीस उपनिरीक्षक सुनील भीमराव घुसळे (वय ५७) यांचे निधन झाले. ही दुर्दैवी घटना रविवार, २६ जानेवारी रोजी घडली. सुनील घुसळे मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गेल्या एका वर्षापासून कार्यरत होते. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाची परेड पार पडल्यानंतर दुपारी त्यांना चक्कर आल्याने त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने डॉ. कोलते हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले. मात्र, रस्त्यातच प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना पुन्हा मलकापूर येथील निरामय हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने पोलीस विभागात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस उपनिरीक्षक घुसळे यांच्या पार्थिवावर २७ जानेवारी रोजी त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!