मलकापूर दि. २५ जानेवारी
आगामी २९ जानेवारी बुधवार रोजी गुरू गोविंदसिंह जयंती आहे. या निमित्त येथील संगतवाडी गुरूद्वारा येथे दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. त्यात यंदाच्या वर्षी देखील भव्य स्वरूपात कार्यक्रमांचे नियोजन करण्याचे ठरवलेले आहे. या नियोजनाच्या संदर्भात गुरुद्वारा प्रबोधन समितीच्या वतीने २७ जानेवारी सोमवार रोजी पत्रकार परिषद घेऊन कार्यक्रमाची माहिती दिली.
गुरुगोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त आयोजित होणाऱ्या या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून गुरूद्वारा प्रबंधनचे बाबा रवींद्रसिंहजी उद्घाटक म्हणून केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, तसेच प्रमुख अतिथी आ.चैनसुख संचेती, बुलढाणा जिल्ह्याचे माजी पोलीस निरीक्षक सुनील कडासने व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
गुरू गोविंदसिंह यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मलकापूरातील ऐतिहासिक संगतवाडी गुरूद्वारा येथे दरवर्षी गुरू गोविंदसिंहाच्या पराक्रमी इतिहासाला उजाळा मिळावा यासाठी विविध माहितीपर कार्यक्रम व उपक्रम घेण्यात येतात. संपूर्ण दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमात सुरुवातीला गुरु ग्रंथ साहेबचे पूजन व मंत्र पठण होणार आहे, त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांकरिता आयोजित विविध स्पर्धा त्यामध्ये चित्रकला स्पर्धा , चित्र प्रदर्शनी, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आदी होणार असून त्यानंतर लगेचच मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीसे व प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांसोबतच गुरुद्वारामध्ये गुरुवाणीची अखंड पाठ सुरू राहील सकाळी चार वाजेपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत गुरुद्वारा लोकांच्या दर्शनासाठी खुला राहील. यावेळी भव्य लंगर भोजनाची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेले असल्याची माहिती प्रबंध समितीच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे या भव्य दिव्याच्या कार्यक्रमात मलकापूर शहरातील सर्व धर्म व समाजाच्या महिला पुरुष बंधू भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन नियोजन समितीचे अशांतभाई वानखेडे यांनी केले.