मलकापूर: विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे शिराढोण येथे विशेष शिबिराचे उद्घाटन १६ जानेवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. शिबिरात रस्ते दुरुस्ती, नदीकाठ आणि स्मशानभूमी स्वच्छता यांसह शिव्या मुक्त गाव, घराघरात संविधान, अंधश्रद्धा निर्मूलन, डिजिटल साक्षरता व स्वच्छता अभियान राबवले जाणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन सन्माननीय मोरेशजी महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाले. प्राचार्य डॉ. वाय. पी. पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम अधिकारी सौ. पुनम इंगळे यांनी प्रास्ताविक केले.
या वेळी गावातील ज्येष्ठ नागरिक नारखेडे सर, पोलीस पाटील विनायक पाटील, संदीप नारखेडे, जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका माधुरी पाटील यांची विशेष उपस्थिती होती. महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. दीपक झोपे व वरिष्ठ लिपिक अधिकारी संजय नारखेडेही उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समृद्धी इंगळे आणि दिपाली इंगळे यांनी केले. आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी श्री. रुपेश पाटील यांनी केले. स्वयंसेवकांनी शिबिराच्या उद्दिष्टांसाठी पूर्ण योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला.