Headlines

नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वाराचा गळा चिरला, खामगाव येथील घटना!

 

खामगाव, दि. १४ (प्रतिनिधी) – मकरसंक्रांतीच्या निमित्ताने पतंगबाजीचा उत्साह चांगलाच वाढला आहे. मात्र, यासोबतच घातक नायलॉन मांजाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे अनेकांना गंभीर दुखापती होत असून खामगाव शहरात याचा फटका बसल्याची घटना समोर आली आहे.भुसावळ चौक येथे १३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता दुचाकीस्वार शेख करीम यांच्या गळ्याला नायलॉन मांजा लागून मोठी दुखापत झाली. दुचाकी चालवत असताना अचानक नायलॉन मांजा त्यांच्या समोर आला. त्यामुळे ते खाली पडले आणि मांजामुळे गळा चिरला.
दरम्यान, सुदैवाने त्यांचे प्राण वाचले असून त्यांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. ही घटना वाहनचालकांसाठी धोक्याचा इशारा असून वाहने चालवताना अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.
बंदी असतानाही शहरात नायलॉन मांजाचा सर्रास वापर होत असल्याने अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!