Headlines

रोहीच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू: देऊळगाव घुबे-भरोसा मार्गावरील घटना

 

अंढेरा : – भरोसा मार्गावर १७ डिसेंबर रोजी संध्याकाळी झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास निर्जन रस्त्यावर एका रोहीने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार पवन ठाकूर गंभीर जखमी झाले आणि जागीच मृत्यू झाला.अपघातानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला. मात्र, अपघाताच्या ठिकाणी कोणीही साक्षीदार नसल्यामुळे सुरुवातीला अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही.पवन ठाकूर यांचे बंधू शरद ठाकूर यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावर अचानक आलेल्या रोहीने पवन ठाकूर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या माहितीच्या आधारे अंढेरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.या घटनेमुळे स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून निर्जन रस्त्यावर वाहतुकीबाबत अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!