मलकापूर :- शहरातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ आज, 18 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास एक अपघाताची घटना घडली. एचडीएफसी बँकेसमोर घडलेल्या या दुर्घटनेत, मालवाहू आयशर ट्रकने निष्काळजीपणे व भरधाव वेगाने सायकलस्वाराला धडक दिली.या अपघातात सईद अहमद अब्दुल कादर (वय 60, रा. माळीपुरा, मलकापूर) यांचा मृत्यू झाला आहे. शहर पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत आयशर ट्रक (क्रमांक जीजे 06 झेडझेड 8911) जप्त करण्यात आला असून, आरोपी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सदर मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून, पुढील तपास मलकापूर शहर पोलीस करत आहेत.