Headlines

कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी माजी आमदार संचेतीसह 8 जण व 15 ते 20 खाजगी अंगरक्षक अश्या 29 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मलकापूर:- सभेच्या पूर्वीच हाय होल्टेज ड्रामा, पोलिसांसोबत बाचाबाची, बाजार समिती प्रवेशद्वार समोर घोषणाबाजी, जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी माजी आमदार संचेतीसह 8 जणांवर व 15 ते 20 खाजगी अंगरक्ष अश्या 29 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी करून कायद्याचे उल्लंघन केले. तसेच पोलिसांनी शांततेच्या आवाहन करून सुद्धा घोषणाबाजी सुरूच ठेवली.
या प्रकरणी मनोज उमाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजी आमदार चैनसुख संचेती, यश सुरेशकुमार संचेती, राहुल ऊर्फ बबलू देशमुख, अतुलसिंह प्रतापसिंह राजपूत, संदीपसिंह नारायणसिंह राजपूत, शुभम संजय काजळे, ऋषिकेश ज्ञानदेव वाघोदे, करणसिंह राजपूत, चंद्रकांत वर्मा असे ९ व १५ ते २० बाउन्सर (खासगी अंगरक्षक) अशा २९ जणांविरुद्ध कलम १४३, १८८ भादंवि व मपोका १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास मलकापूर पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *