Headlines

नाम बडे दर्शन छोटे; मलकापूर शहरातील खाजगी दवाखान्यांमध्ये लिफ्ट बंद, वयोवृद्ध व गर्भवती महिलांना होतोय त्रास! डॉक्टर रुग्णांची काळजी घेतील का?

 

मलकापूर ( उमेश ईटणारे ) शहरातील अनेक खाजगी दवाखान्यांमध्ये लिफ्ट बंद असण्यामुळे रुग्णांना मोठा त्रास होतो आहे. गर्भवती महिलांना तपासणीसाठी आणि डिलिव्हरी नंतरच्या महिलांना चळ उतार करणे अत्यंत कठीण होत आहे. अशा परिस्थितीत, लिफ्ट ही एक अत्यंत आवश्यक सुविधा आहे. पण अनेक दवाखान्यांमध्ये ही सुविधा बंद आहे, ज्यामुळे रुग्णांची हालचाल अवघड होऊन त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे. रुग्णांकडून वाढत्या किमतींवर डॉक्टर पेशंट कडून पूर्ण पैसे घेत असताना, पाहिजे तशी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांमध्ये नाराजी वाढत आहे. गंभीर रुग्णांना पायऱ्यांवरून उचलून नेणे अवघड आणि धोकादायक ठरू शकते. रुग्णांची सुरक्षा आणि आराम यासाठी लिफ्टची कार्यशीलता अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक रुग्णांना लिफ्टची सुविधा न मिळाल्याने त्यांना दवाखान्यातील सेवेबद्दल प्रश्न पडत आहेत.”दवाखान्यांमध्ये लिफ्ट फक्त शोभेची वस्तू बनून राहिली आहे का?” असाही प्रश्न उपस्थित होतो आहे. जर दवाखान्यांमध्ये आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध असल्या तर रुग्णांचे अनुभव अधिक चांगले आणि सुरक्षित होऊ शकतात.यावर खाजगी दवाखाने व डॉक्टरांनी तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. लिफ्ट सुविधा दुरुस्त करून, रुग्णांच्या सोयीसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे रुग्णांच्या जीवनमानात सुधारणा होईल आणि दवाखान्यांवर असलेली विश्वासार्हता कायम राहील.

चौकट :- रुग्णांच्या हक्कांसाठी सुविधा आणि योग्य काळजी आवश्यक आहे. मलकापूर शहरातील दवाखान्यांनी लिफ्टची दुरुस्ती त्वरित केली पाहिजे, जेणेकरून रुग्णांना योग्य उपचार आणि सुरक्षितता मिळू शकतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!