मलकापूर, 26/11/24 – स्त्रियांसाठी पोषण आहार आणि गर्भधारणेदरम्यान आवश्यक असणारे महत्त्वाचे पोषण तत्व यावर मार्गदर्शन करणारे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर मलकापूर येथील त्रिरत्न बुद्ध विहार हॉलमध्ये संपन्न झाले. एकात्मिक बाल विकास प्रकल्प मलकापूर यांच्यावतीने 25 व 26 नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या या शिबिरात अंगणवाडी मदतनीस यांना पोषण आहार, गर्भधारणेतील आहाराचे महत्त्व आणि स्तनपानाचे फायदे यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.प्रशिक्षण शिबिरात वैशाली वैराळकर यांनी गर्भधारणेदरम्यान योग्य पोषणाचा अभ्यास करून, हिरवा भाजीपाला, मास, चिकन, गोड मका, खजूर, तीळ, नाचणी आणि वाटाण्याचे सेवन महत्त्वाचे असल्याचे सांगितले. त्यांनी बाळाच्या विकासासाठी योग्य आहार घेण्याच्या सल्ल्यानंतर, बाळाला स्तनपानाच्या फायदेशी चर्चा केली. यावेळी, आईचे पहिले दूध बाळाची रोग प्रतिकारशक्ती वाढवते, तसेच बाळाचे पहिले लसीकरण असते, हे स्पष्ट करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
या शिबिरात एकात्मिक बाल विकास प्रकल्प मुख्य सेविका सी. एन. पाचपोळ आणि सोहेल शेख यांनी देखील मार्गदर्शन केले. शिबिरात उपस्थित अंगणवाडी मदतनीस ज्योती दांडगे, अनिता वानखेडे, गुंजन अवसरमोल, सुनिता चव्हाण, सुनिता तळेकर, आफिया जरीन, फलकनाज, कौशल भिडे, रेखा सातव, अरुणा सातव, निलोफर फातिमा, रुकसार शेख निसार, दुर्गा चोपडे आणि शहाणा यासह अनेक मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.