हिंदू भगिनींचे 60 तुकडे झालेले मी पाहू शकत नाही, मला त्याबद्दल तीव्र यातना होतात; जर मी महाकाली असती तर दहा हातांनी त्यांचा नाश केला असता- शहनाज अख्तर
“शहनाज अख्तर यांच्या ऐतिहासिक गायन सोहळ्याला हिंदू बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, मलकापूरमध्ये एकात्मतेचा संदेश, निवडणुकीला नवी दिशा”
मलकापूर( उमेश इटणारे ):- मलकापूर शहर आणि तालुक्यातील हिंदू बांधवांनी आज शहनाज अख्तर यांच्या ऐतिहासिक गायन सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, आणि हा कार्यक्रम एक ऐतिहासिक टप्पा ठरला. समर्पण लॉन येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात शहर आणि परिसरातील हजारो लोक सहभागी झाले होते, ज्यात हिंदू धर्माच्या एकात्मतेचा आणि जागरूकतेचा संदेश प्रबळपणे दिला गेला.शहनाज अख्तर यांच्या सुमधुर गायनावर तरुण पिढीनी ठेका धरला आणि कार्यक्रमातील वातावरण उंचावले. शहनाज अख्तर यांच्या “जो हिंदू हित की बात करेगा वही मलकापूर मतदारसंघ पे राज करेगा” अशा ठाम शब्दांनी उपस्थितांची उत्साही मनं जिंकली. त्याच वेळी, त्यांनी भाजपाचे अधिकृत उमेदवार आणि आमदार चैनसुख संचेती यांना सर्व हिंदू बांधवांनी एकजूट होऊन पाठिंबा देण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेवर लक्ष ठेवता, मलकापूर मतदारसंघात एक नवीन राजकीय दिशा ठरवण्याची क्षमता दिसून येते. सहभागी नागरिकांचे उत्स्फूर्त प्रतिसाद आणि एकजूट यामुळे, या ऐतिहासिक सोहळ्याला अजून मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठी गर्दी जमल्याने काहीजण झाडांच्या फांदीवर, काहीजण भिंतीवर तर इमारतींच्या छतावर उभे राहून कार्यक्रमाचा आनंद घेत होते. यावेळी तरुणांचा उत्साह शिखरावर होता, आणि प्रत्येकजण कार्यक्रमाचा आनंद घेत होता.कार्यक्रमात बोलताना शहनाज अख्तर यांनी आपल्या व्यक्तिगत विचारांची आणि हिंदुत्वासाठीच्या संघर्षाची ओळख दिली. त्यांनी सांगितले, “मी नावाने मुस्लिम आहे, पण मी पंचवीस वर्षांपासून हिंदुत्वासाठी काम करत आहे. २००५ मध्ये ‘भगवा रंग’ या गाण्याने मी प्रसिद्ध झाली. तेव्हा हिंदू धर्माच्या लोकांनी मला खूप मोठं समर्थन दिलं होतं. तुम्ही मला महाकाली, दुर्गा चंडी, राणा चंडी असं कशाही नावाने संबोधू शकता. मुलींना सांगते, तुमचं धर्मावर प्रेम करा, धर्माशी एकजूट राहा. मी माझ्या हिंदू भगिनींचे साठ तुकडे झालेले पाहू शकत नाही, मला त्याबद्दल तीव्र यातना होतात. जर मी महाकाली असते, तर दहा हातांनी त्यांचा नाश केला असता.”शहनाज अख्तर यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थित हिंदू बांधवांचे मनोबल उंचावले आणि कार्यक्रमाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. त्यांच्या ठाम वक्तव्यामुळे मलकापूर मतदारसंघातील राजकीय वातावरणाला एक नवा मोड मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी शहनाज अख्तर यांनी एक महत्त्वपूर्ण संदेश दिला, “हिंदुत्वासाठी भाजपाचे अधिकृत उमेदवार चैनसुख संचेती यांना सर्व हिंदू बांधवांनी समर्थन द्यावे. त्यांना मतदान करून, आणि आशीर्वाद देऊन त्यांचा विजय सुनिश्चित करा.”निवडणुकीला नवी दिशा देणारा हा कार्यक्रम मलकापूर मतदारसंघात आगामी राजकीय लढाईसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो.