शेगाव : नदीत पोहण्यासाठी
गेलेल्या दोन चिमुकल्यांचा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना काल,९ ऑक्टोबरला शेगाव तालुक्यातील बेलुरा येथील बोर्डी नदी पात्रात घडली. कृष्णा राजू फुटवाईक (१४ रा. बेलूरा) आणि शुभम गजानन पुरी (१४, रा. माटरगाव) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. जलंब पोलीस स्टेशन हद्दीत बेलुरा नदीपात्रात काल ही घटना घडली. दोघे पोहण्यासाठी गेले होते. नदीमध्ये उतरल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.