उमेश ईटणारे
मलकापूर :- तालुक्यातील दाताळा येथील निंबादेवी रोडवर असलेल्या एका शेतात जंगली प्राण्याने वासराची शिकार केली ही घटना दि. 29 रोजी घडली असून सकाळी शेतात गेल्यानंतर उघडकीस आली.( कैलास अंबादास इंगळे ) यांची निंबादेवी रोडवर शेती आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी शेतात गुरे बांधून घरी आले दरम्यान सकाळच्या सुमारास शेतात दूध काढण्यासाठी गेले असता त्यांना बांधलेल्या गुरांपैकी एका वासरीची शिकार झाल्याचे दिसून आले. या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने वासरीची शिकार बिबट्याने केली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान तीन दिवसाआधी लोणवडी – दुधलगाव रस्त्यावर एक बिबट्या एका चार चाकी वाहन चालकाला दिसून आला होता. सदर वाहन चालकाने बिबट्याच्या व्हिडिओ आपल्या कॅमेरात कैद केला होता त्यानंतर हा व्हिडिओ सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. बिबट्याचा परिसरात वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीची वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान दाताळ्यामध्ये वासराची शिकार झाल्याने दुधलगाव रोडवरील बिबट्याने तर ही शिकार केली नाही नां? अशी चर्चा परिसरामध्ये सुरू आहे. बिबट्याला लवकर जेरबंद करावे अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहे.