Headlines

हृदयविकाराच्या झटक्याने 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, मलकापूर शहरातील घटना!

मलकापूर : शहरातील नसवाला चौक येथे राहणा-या विनोद क्षीरसागर (जैन) या ५० वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी, १७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता घडली. जुन्या गावातील नसवाला चौकातील रहिवासी विनोद फुलचंद क्षीरसागर (जैन) हे आपल्या घरासमोर साफसफाई करून त्यानंतर जैन मंदिरात देवपूजा करण्याकरिता जाण्याची तयारी करत होते. त्यावेळी ते रस्त्यावरच खाली पडले. त्यावेळी त्यांना परिसरातील नागरिकांनी तातडीने उचलून दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याचे सांगितले.त्यांच्या पश्चात पाच बहिणी, दोन भाऊ असा मोठा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *