मलकापूर :- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अलका जी लाम्हा, तसेच महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी च्या अध्यक्ष आदरणीय संध्या ताई सव्वालाखे यांच्या आदेशानुसार बुलढाणा जिल्हा महिला काँग्रेस कडून मलकापूर विधानसभे मध्ये हरनखेड या गावी मंगलाताई पाटील जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस यांच्या नेतृत्वात
” खर्चे पे चर्चा “हा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, कुटुंबाचे घटलेले उत्पन्न, महिलांवर वाढलेले अन्याय अत्याचार या सर्व बाबींवर चर्चा करण्यात आली. या चर्चे
मध्ये ग्रामीण महिलांनी आपला खूप सहभाग नोंदवला.व आम्हाला 1500 नको महागाई कमी करा, आमच्या मालाला हमी भाव द्या, आमच्या मुलांना रोजगार द्या, जुने दिवस परत द्या आश्या अपेक्षा व्यक्त केल्या या कार्यक्रमाला बुलढाणा जिल्हामहिला अध्यक्ष सौ. मंगलाताई पाटील, मलकापूर तालुका अध्यक्ष प्रीती ताई भगत, कल्पना पाटील जिल्हा महिला सचिव, संगीता ताई वणारे जेष्ठ नेत्या, विजया मोरे, व हरनखेड येथील सर्व महिला भगिनी उपस्थित होत्या.