मलकापुर:- शेतकऱ्यांच्या शेतातील पोलवरील विद्युत तारा चोरट्यांनी चोरुन नेल्याच्या घटना मलकापुर, नांदुरा,मोताळा, जळगांव (जामोद)पोलीस स्टेशन हद्दीत घडल्या असुन बऱ्याच ठिकाणी या मध्ये गुन्हे दाखल झाले आहे,पोलीसांनी चोरट्यांकडून तारा जप्त केल्या असून त्या तारा पोलीस स्टेशनमध्ये पडलेल्या आहे, शेतातील खांब्यावर तार नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील शेतात पाणी उपलब्ध असुन सुद्धा पिकांना,गुराढोरांना पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे तेव्हा म.रा.वि.वि कंपनीने विद्युत चोरीचे तार कोर्टामार्फत ताब्यात घेऊन संबंधित शेतकऱ्यांचे शेतात लावावे अन्यथा शिवसेना (उ.बा.ठा) लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे म.रा.वि.वि कंपनी कार्यकारी अभियंता तायडे यांना देण्यात आला आहे, निवेदन देतेवेळी शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, मलकापुर शहरप्रमुख गजानन ठोसर, उपशहरप्रमुख बाळू पोलाखरे,शे.समद कुरेशी, कामगार सेना शहरप्रमुख हरीदास गणबास,किसान सेना शहरप्रमुख सै.वसीम,पवन गरुड,दिपक सरोदे, चाॅद चव्हाण,मो.मुसा सह आदिंची उपस्थिती होती.