मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचा सामाजिक उपक्रम: नायलॉन मांजापासून बचावासाठी मोटारसायकल स्वारांना दिला सुरक्षा कवच
मलकापूर:- मकर संक्रांतीचा हंगाम सुरू असून, पतंग उडवण्याचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळत आहे. परंतु, नायलॉन मांजाचा वापर करताना अनेक दुर्दैवी घटना घडत आहेत. नायलॉन मांजामुळे अनेक नागरिकांचा गळा चिरला जाऊन मृत्यू झाल्याच्या किंवा जखमी झाल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. या अपघातांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने अभिनव उपक्रम…
