दहावी परीक्षेसंदर्भात ठाणेदार संदीप काळे यांचा विद्यार्थ्यांसोबत संवाद – आत्मविश्वास आणि संयमाचा दिला मंत्र
मलकापूर:- दहावीच्या बोर्ड परीक्षेला सुरुवात होताच तालुक्यातील डी.ई.एस. हायस्कूल, दाताळा येथे विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी संवाद सत्र आयोजित करण्यात आले. ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे यांनी या विशेष सत्राद्वारे विद्यार्थ्यांना भयमुक्त, तणावरहित आणि आत्मविश्वासाने परीक्षा देण्याचे मार्गदर्शन केले. शालेय प्रशासनाच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये आत्मप्रेरणा निर्माण करण्यावर भर देण्यात आला. मार्गदर्शन करताना संदीप…
