नगर परिषद मलकापूर निवडणुकीत उमेदवारीची अभूतपूर्व गर्दी; अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस ठरला ऐतिहासिक; नगराध्यक्ष पदासाठी 20, सदस्य पदासाठी तब्बल 359 अर्ज
मलकापूर ( उमेश इटणारे ):- नगर परिषद निवडणुकीसाठी आजचा दिवस निर्णायक ठरला. 17 नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच नगर परिषद कार्यालयात उमेदवार आणि कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी उसळली होती. पक्षीय तसेच अपक्ष उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत धावपळ करत राजकीय वातावरण चांगलेच तापवले. सदस्य पदासाठी आज तब्बल २२२ अर्ज दाखल झाले. कालपर्यंतच्या १३७…
