शिर्डी :- शिर्डी येथील हॉटेलच्या छतावरून पडून नांदुरा तालुक्यातील शेंबा येथील २४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना १४ जुलै रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास – उघडकीस आली.शुभम सुहास नारखेडे (वय २४ वर्ष) असे मृतकाचे नाव आहे. शेंबा येथील शुभम सुहास नारखेडे हा मित्रांबरोबर शिर्डी येथे दर्शनासाठी गेला होता. शिर्डी येथील हॉटेलच्या छतावर १३ जुलै रोजी रात्री त्यांनी पार्टी केली. १४ जुलै रोजी सकाळी शुभमचा शोध घेतला असता तो खाली पडलेला दिसून आला. पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून रुग्णवाहिकेतून शुभम याला दवाखान्यात हलविले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.