मलकापूर :- गेल्या वीस ते पंचवीस दिवसा अगोदर झालेल्या वादळी पावसामुळे विद्युत पोल पडून वरखेड लासुरा शिवारातील अनेक ठिकाणी नुकसान झाले होते. त्याची पुनः उभारणी करत वीज पुरवठा सुरू होऊन वीस दिवस उलटून गेले तरी मेन्टेनन्स अभावी थोडी जरी हवा पाणी सुरू झाले तरी लासुरा वरखेड शिवरात्री लाईट लगेच बंद होते. हा सपाटा गेले जवळजवळ वीस पंचवीस दिवस झाले तसेच सुरू आहे संध्याकाळी थोडा वारा पाणी सुरू झाला की लाईट बंद होणे आणि या दोन्ही गावांना रात्र अंधारात काढावी लागते. गेल्या चार रात्री अशाच पद्धतीने अंधारात गेल्यानंतर आज मात्र येथील नागरिकांनी हि बाब संभाजी शिर्के यांच्या कानावर घातली असता वरखेड येथील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह संभाजी शिर्के यांनी दाताळा उपकेंद्रवर रात्री 9वाजता धडक देत रात्री अभियंतांना जाब विचारत ताबडतोब वीज पुरवठा सुरू झाला पाहिजे करिता यंत्रणा कामाला लावण्याची विनंती केली.त्याची दखल घेत अभियंतांनी ताबडतोब यंत्रणा कामाला लावून रात्री वरखेड शिवारातील वीज पुरवठा सुरू केला. तसेच दुसऱ्या दिवशी कंत्राटदार व एम एस ई बी चे कर्मचारी मिळून पूर्ण फिटरचे मेंटनस केल्या जाईल अशा पद्धतीची काही देण्यात आली. उद्या पूर्ण फिटरची मेंटनस होऊन व्यवस्थित मार्गी न लागल्यास नंतर आक्रमक आंदोलन करण्यात येईल अशा पद्धतीचा इशारा संभाजी शिर्के यांनी अभियंत्यांना दिला यावेळी वरखेड येथील सरपंचासह 30 ते 40 युवक उपस्थित होते.
लासुरा वरखेड फिडरचे मेंटेनन्स करा..संभाजी शिर्के यांनी खडसावत आंदोलनाचा इशारा देताच कर्मचारी रात्रीच लागले कामाला
