मलकापूर : ज्याचं काम त्यानेच नाय केलं, उलट शहाणपणा शिकवायला निघाला! वाकोडी ग्रामपंचायतीत अवैध रेती वाहतुकीविरोधात आवाज उठवणाऱ्या युवकाने पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केल्यावर गावात खळबळ उडाली. पण खळबळीत खरं उघडं पडलं ते एका पोलीस कर्मचाऱ्याच्या बडबडीमुळे!
हे साहेब आहेत सरकारी नोकरीत, पण वागणं मात्र गल्लीतील आगाऊ पोरांसारखं! गावकरी जीव धोक्यात घालून अन्यायाविरुद्ध उभे राहतात आणि हे महाशय मात्र दुसऱ्यांवरच चिखलफेक करत फिरतात. म्हणजे चोर स्वतःच आणि ओरडतो मात्र शेजाऱ्याच्या नावानं!
“स्वतःची चूल धूरांनी भरली, आणि शेजाऱ्याच्या घरात वाऱ्याचं आरोप करतो!” ही म्हण जशीच्या तशी लागू होते या पोलीस कर्मचाऱ्यावर. त्याची भाषा, त्याचे शब्द, आणि त्याचं वागणं – सगळंच इतकं खालच्या थरावरचं की, सभ्य समाजात नाक दाखवता कामा नये.
पत्रकारांवर बिनबुडाचे आरोप करताना हा कर्मचारी विसरतो की, “सावल्यांना दोष देणाऱ्यांनी आधी दिवा लावायला शिकावं!” स्वतःच्या काळ्या कृत्यांना झाकण्यासाठी, चिखलात लोळून दुसऱ्याला ओंगळ ठरवायचा प्रयत्न हा केविलवाणा नव्हे तर विकृत वृत्तीचं लक्षण आहे. पोलीस दलात काम करणारा असला तरी हा व्यक्ती खुपचं याच्यापुढे “बिनकुपीचा” वाटतो. कारण अशा प्रकारची बडबड हे केवळ स्वतःचं वाभाडं काढण्यासारखं आहे. “आपलं पान खरं नसताना दुसऱ्याच्या ताटात बोट घालणं,” हे या माणसाचं रोजचं काम झालंय. योगेश काजळे यांनी अवैध रेती माफियांविरोधात उभं राहत आपल्या जिवाची बाजी लावली, आणि दुसरीकडे हा वसुली सम्राट कर्मचारी स्वतःच्या मांडवाखाली अंधार लपवून बसलाय. “झाकली मूठ सव्वा लाखाची” असं समजणारा हा कर्मचाऱ्याने लक्षात घ्यावं — काळं कुत्रं कितीही रंगवलं तरी ते सिंह होत नाही! त्यामुळे पत्रकारांना विषयी बोलतांना थोडं तोंड संभाळूनच बोलावं उगाच काहीही बडबडून अकलेचे तारे तोडू नयेत… अजून बडबड कराल तर ” साहेबांना दोन” पाहिजे…. “मांजर दूध पितांना डोळे बंद करून पिते” तिला वाटते आपल्याला कोणी बघ नाही, मात्र तिला सर्व जण बघता असतात…. तूर्तास एवढंच.
