Headlines

शैक्षणिक क्षेत्रात चांगल्या गुणवत्तेचा वारसा जपणाऱ्या चांडक विद्यालयाचा निकाल पुन्हा एकदा तेजस्वी; चांडक विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

मलकापूर:- नगर सेवा समितीद्वारा संचालित लीलाधर भोजराज चांडक विद्यालयाने शैक्षणिक गुणवत्तेचा वारसा जपत पुन्हा एकदा आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. गुणवत्ता, शिस्त आणि सातत्य यांवर भर देणाऱ्या या संस्थेने यंदाच्या निकालात 96 टक्के यशप्राप्ती मिळवत परीक्षाफलात आपली छाप उमटवली आहे.

या वर्षी विद्यालयाचा एकूण निकाल 96 टक्के लागला असून प्रविण्याश्रेणीत 122 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 83 विद्यार्थी आणि द्वितीय श्रेणीत 44 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कु. भारती अनिल वानखेडे हिने 96 टक्के गुण मिळवून विद्यालयात अव्वल क्रमांक पटकावला. तिच्या पाठोपाठ प्रवीण रवींद्र नरवाडे (95.4%), कु. अर्पिता अनंत नरवाडे (95.2%), कु. राशीं सुरेश वानखेडे (95%) आणि वेदांत अशोक नरवाडे (94.6%) यांनी अनुक्रमे दुसरा ते पाचवा क्रमांक मिळवत शाळेचा गौरव वाढवला. विशेष म्हणजे, विद्यालयातील 49 विद्यार्थ्यांनी 85 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यालयातर्फे त्यांचे कौतुक करण्यात आले असून, शैक्षणिक क्षेत्रात हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
या यशामध्ये विद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. जयंत मुगुटराव राजुरकर यांचे मार्गदर्शन, शिक्षकवर्गाचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि पालकांचे सक्रिय सहकार्य यांचा मोठा वाटा असून, विद्यार्थ्यांनीही कष्ट, जिद्द व चिकाटीच्या जोरावर हे घवघवीत यश संपादन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!