मलकापूर:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल आज १३ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. मलकापूर तालुक्याचा निकाल ९३.८६ टक्के लागला असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी एन. जे. फाळके यांनी दिली.
तालुक्यातील विविध शाळांचा निकाल पुढीलप्रमाणे आहे
ग्रामीण विकास विद्यालय बेलाड – १००%
भारत भारती कॉन्व्हेंट – १००%
स्व. आबासाहेब देशमुख विद्यालय वडोदा – १००%
आयडीयल इंग्लिश स्कूल जांबुळधाबा – १००%
उर्दू गर्ल्स हायस्कूल – ९९.३२%
विद्याविकास विद्यालय वाकोडी – ९८.८५%
नुतन विद्यालय – ९८.४३%
दाताळा शिक्षण समिती – ९८.१९%
यशवंत विद्यालय वडजी – ९८%
मौलाना आझाद उर्दू हायस्कूल – ९७.३६%
अलिअलाना उर्दू हायस्कूल – ९६.१५%
आदर्श विद्यालय – ९५.४५%
चांडक विद्यालय – ९५.१६%
विवेकानंद विद्यालय नरवेल – ९४.३३%
जीवन विकास विद्यालय दुधलगाव – ९४.५०%
झकेरिया उर्दू हायस्कूल – ९३.०७%
लक्ष्मी विद्यालय म्हैसवाडी – ९२.८५%
धरणगाव शिक्षण समिती – ९२.३६%
झेड. पी. हायस्कुल मलकापूर – ९१.४२%
व्ही. एन. लाहुडकर महाविद्यालय दसरखेड – ९०.९०%
नुतन विद्यालय निमखेड – ८९.४७%
हिराबाई संचेती कन्या शाळा – ८६.९५%
आदर्श विद्यालय उमाळी – ८२.७५%
मो. ते. विद्यालय देवधाबा – ८१.५७%
गोविंद विष्णू महाजन विद्यालय – ८३.३३%
म्युनिसिपल हायस्कूल – २८.१२%
एकूण निकाल समाधानकारक असून अनेक शाळांनी शंभर टक्के निकाल नोंदवून यश मिळवले आहे.