Headlines

घरफोडी करणाऱ्या दोघांविरुद्ध शेगाव पोलिसांत गुन्हा दाखल!

शेगाव : – घरात कुणी नसल्याची संधी साधून घरफोडी करणाऱ्या दोघांविरुद्ध शेगाव शहर पोलिस ठाण्यात २९ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी रविंद्र आनंदराव मुरुमकर (वय ३९, रा. गौलखेड रोड, पवारवाडी, शेगाव) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केलं की, ते २४ एप्रिल रोजी कामानिमित्त बाहेरगावी गेले असताना आरोपी राजू बागवान व सय्यद शकील सय्यद युसूफ (दोघेही रा. बुलडाणा) यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडले. त्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाटातील लॉकरमधून रोख ७५ हजार रुपये चोरून नेले.
या तक्रारीवरून शेगाव पोलिसांनी राजू बागवान आणि सय्यद शकील सय्यद युसूफ यांच्याविरुद्ध अप. क्र. ४३५/२५, कलम ३३१(४), ३३१(३), ३०५ भादंवि २०२३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो.हे.का. संजय करूटले करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!