Headlines

विदर्भ लाइव्हच्या दणक्याने प्रशासनाला जाग! बुलढाणा रोडवर पुन्हा कचरा गाडी सुरू

मलकापूर (दिपक इटणारे): बुलढाणा रोड आणि व्यापारी पट्ट्यात तीन दिवस गायब असलेली कचरा गाडी अखेर विदर्भ लाइव्हच्या बातमीनंतर सुरू झाली आहे. शहरातील स्वच्छतेबाबत प्रशासनाच्या दुर्लक्षावर विदर्भ लाइव्हने आवाज उठवताच, नगरपालिका प्रशासनाने हालचाल केली आणि कचरा गाडी पुन्हा नियमित फिरू लागली.
गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याचा ढीग साचत असल्याने व्यापारी आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. विदर्भ लाइव्हने “बुलढाणा रोडवर सलग तिसऱ्या दिवशीही कचरा गाडी गायब” ही बातमी प्रकाशित केल्यानंतर, प्रशासनावर दबाव वाढला आणि तत्काळ कचरा व्यवस्थापन सुरळीत करण्यात आले. व्यापारी आणि नागरिकांनी विदर्भ लाइव्हच्या प्रभावी पत्रकारितेचे कौतुक केले असून, “माध्यमांनी आवाज उठवल्यावरच प्रशासन जागते, ही वस्तुस्थिती आहे,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. नागरिकांनी यापुढेही प्रशासनाने स्वच्छता व्यवस्थापनावर नियमित लक्ष द्यावे आणि “स्वच्छ भारत अभियान” कागदावर न राहता प्रत्यक्ष अंमलात आणावे, अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!