Headlines

कामरान ने केले चुकीचे काम; समाज माध्यमावर वादग्रस्त व्हिडिओ टाकल्याने अमडापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

 

( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा )
बुलढाणा : समाज माध्यमांचा गैरवापर करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशाच एका प्रकरणात अमडापूर पोलिसांनी वादग्रस्त व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे. कामरान अन्सारी असे आरोपीचे नाव असून, त्याने समाज माध्यमांवर दोन समाजांत द्वेष आणि तणाव निर्माण करणारा व्हिडिओ पोस्ट केला होता. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकरणांमुळे समाजात गैरसमज पसरून शांतता भंग होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, समाज माध्यमांवर चुकीची माहिती किंवा वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या अमडापूर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!