Headlines

घरात शिरलेल्या सापाचा बहीण भावावर हल्ला.. बहिणीचा मृत्यू; भावावर उपचार सुरू!

जालना : – अंबड शहरालगतच्या म्हाडा कॉलनीत शनिवारी (1 मार्च) पहाटे घडलेल्या दुर्दैवी घटनेत सापाच्या दंशाने 8 वर्षीय श्रध्दा मनोहर खरात हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर तिचा 14 वर्षीय भाऊ मकरंद खरात जखमी असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मनोहर खरात हे आपल्या पत्नी, आई आणि पाच मुलांसह पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. अपुऱ्या जागेमुळे कुटुंबातील काही सदस्यांना स्वयंपाकघरात झोपावे लागते. नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री जेवण झाल्यानंतर सर्वजण झोपले असताना, पहाटे एक वाजता श्रध्दा आणि मकरंद यांना सापाने दंश केला.
श्रध्दाला प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने तिला व मकरंदला अंबड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना जालना येथील शासकीय रुग्णालयात हलवले. मात्र, उपचार सुरू असतानाच श्रध्दाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर मकरंदवर अद्याप उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!