Headlines

चाकूचा धाक दाखवत दीड लाखांची लूट, आरोपी पोलीस कोठडीत, मलकापूर शहरातील घटना!

मलकापूर : वाहन अडवून जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न करत दीड लाख रुपयांचा ऐवज लुटल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. इस्माइल उर्फ बाबू खान रहमान खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

रहिम शेख, काळू शेख (रा. मदर टेकीडी, पारवे, मलकापूर) आणि त्यांचे साथीदार र. चिंचवड, पुणे हे सोमवारी, ३० डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास मित्राच्या घरी जात होते. यावेळी आरोपीने त्यांचे वाहन अडवून चाकूच्या धाकाने ५० हजार रुपयांची सोन्याची चैन व एक लाख रुपयांची रोख रक्कम असा ऐवज लुटला.या घटनेनंतर रहिम शेख आणि काळू शेख यांनी मलकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून इस्माइल खान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत पाठवले आहे. पुढील तपास मलकापूर पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!