बुलढाणा :- बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोलीस दलातील ४७ अंमलदारांना पदोन्नतीचे गिफ्ट दिले. या अंतर्गत १९ हेड कॉन्स्टेबलना सहायक पोलीस उपनिरीक्षक, तर २७ पोलीस नाईकांना हेड कॉन्स्टेबल पदावर पदोन्नती देण्यात आली.पदोन्नतीसह ईच्छित स्थळी बदलीचा पर्याय उपलब्ध करून दिल्यामुळे अंमलदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पानसरे यांनी पद्भार स्विकारल्यापासून पोलीस दलातील कार्यक्षमता वाढवण्यासाठी अनेक सकारात्मक उपक्रम राबवले आहेत. या निर्णयामुळे बुलढाणा पोलीस दलाच्या कामगिरीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.