अकोला – सोशल मीडियावरील ओळखीचे रूपांतर मैत्री व नंतर प्रेमसंबंधांमध्ये होऊन एका अल्पवयीन मुलीकडून शारीरिक सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.पीडित मुलगी सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी असून, तिची ओळख इंस्टाग्रामच्या माध्यमातून जुने शहरातील आरोपी जय शर्मा याच्याशी झाली. ओळखीचे मैत्रीत व पुढे प्रेमसंबंधांत रूपांतर झाले. यानंतर आरोपीने पीडितेकडून शारीरिक सुखाची मागणी करत तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पीडितेने नकार दिल्यानंतर आरोपीने तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.तक्रारीत पीडित मुलीने आरोपीला १०५ ग्रॅम सोन्याचे दागिने दिल्याचे नमूद केले आहे. आरोपीच्या या कृत्यामुळे मानसिक व आर्थिक त्रास सहन करणाऱ्या पीडितेने अखेर जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलीसांनी आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत व भारतीय दंड विधानाच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.