Headlines

“चोराच्या पावलांना शेजाऱ्याच्या कानांची धार, चोरट्यास रंगेहाथ पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात; शेगांव येथील घटना!

शेगाव :- शहरातील वार्ड क्रमांक २ मधील ओम नगरमध्ये १७ डिसेंबरच्या मध्यरात्री चोरीच्या प्रयत्नाचा थरार उघडकीस आला. रात्री २.३० वाजताच्या सुमारास “चोर-चोर” असा गोंगाट ऐकून सुनिल जगन्नाथ ठोंबरे हे घराबाहेर आले. यावेळी त्यांनी पाहिले की, त्यांचे जावई दिगांबर संपतराव हाके यांच्या घरात चोरटा शिरलेला आहे.चोरट्याने घरातील आलमारी उघडून एका बॅगेत कपडे भरत असताना त्याला ठोंबरे यांनी रंगेहात पकडले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव हरीष धनराज गवई (वय २८, रा. माना कुरूम, ता. मुर्तीजापूर, जि. अकोला) असल्याचे सांगितले.

चोरट्याला ताबडतोब शेगाव शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रकरणी सुनिल ठोंबरे यांनी शेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रसंग पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी चोऱ्यांच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी सतर्कतेचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!