स्वच्छ भारत केवळ पोस्टरवरच – कुलमखेल परिसरात घाणीचे साम्राज्य, नागरिक त्रस्त; प्रशासन धृतराष्ट्राच्या सोंगेत
मलकापूर – “स्वच्छ भारत, सुंदर भारत” ही केंद्र सरकारची घोषणा प्रत्यक्षात केवळ पोस्टर आणि भाषणांपुरती मर्यादित राहिल्याचे विदारक चित्र मलकापूर शहरातील कुलमखेल परिसरात पाहायला मिळत आहे. या भागात रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी आणि मोकाट जनावरांचा वावर असल्याने स्थानिकांचे जीवनमान थेट धोक्यात आले आहे. दररोज सडलेल्या अन्नपदार्थांचा वास, प्लास्टिकच्या पिशव्या, औषधींचा कचरा आणि नाल्यांतील…
