वृत्तसंस्था
पुणे : वर्षाविहारासाठी
लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात पर्यटनासाठी आलेले एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले आहेत. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटर फॉल येथून एक कुटुंब वाहून गेले आहेत. ग्रामस्थ, वन्यजीव रक्षक, पोलीस यांच्या मदतीने शोधमोहीम सुरू आहे. आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. वाहून गेलेल्यांमध्ये लहान मुलांचा आणि महिलांचा समावेश आहे.
भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्याला रेल्वेचा वॉटर फॉल म्हणून ओळखले जाते. हे कुटुंब रविवारी परिवारासोबत वर्षाविहारासाठी या परिसरात आले होता. पाण्याच्या प्रवाहात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी कुटुंब. मात्र, पाण्याला वेग असल्याने वाहून गेले. एकमेकांना वाचवण्यासाठी प्रयत्नात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. धबधब्यातील पाण्याचा प्रवाह भुशी धरणात येते, तिथे शोधकार्य सुरू आहे. पर्यटकांची पंढरी समजल्या जाणाऱ्या लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे.