मलकापूर प्रतिनिधी:- येथील आठवडी बाजारात काही व्यापारी लोकांनी टिन पत्राचे गोडाऊन बाधले,या मध्ये ४ मे रोजी रात्री ९ च्चा सुमारास आग लागल्याने दोन गोडाऊन धारकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. आठवडी बाजार येथील एका गोडाऊन मध्ये कांदा तर दुसऱ्या गोडाऊन मध्ये आंबे ठेवले होते रात्री ९ च्चा सुमारास बाजूला असलेल्या अवैध दारू दुकाना जवळ दारुड्याने बीडी पिऊन किंवा कोणीतरी कचरा जाळल्याने ही आग लागली असल्याचा कयास वर्तवली जात आहे. आग लागली तेंव्हा आजुबाजुच्या व्यापाऱ्यासह नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग मोठ्या प्रमाणात असल्याने नगर परिषद अग्नी शामक गाडी बोलवण्यात आली या दरम्यान आग विझवण्यात यश प्राप्त झाले परंतु दोन्ही व्यापाऱ्यांचा लाखो रुपयांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले,यात आंबा व्यवसायिक समद फ्रुट वाले,तर कांदा विक्रेते रफिक भाई असे दोघांचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच परीसरात एकच खळबळ उडाली होती