Headlines

हृदयविकाराच्या झटक्याने 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, मलकापूर शहरातील घटना!

मलकापूर : शहरातील नसवाला चौक येथे राहणा-या विनोद क्षीरसागर (जैन) या ५० वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी, १७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता घडली. जुन्या गावातील नसवाला चौकातील रहिवासी विनोद फुलचंद क्षीरसागर (जैन) हे आपल्या घरासमोर साफसफाई करून त्यानंतर जैन मंदिरात देवपूजा करण्याकरिता जाण्याची तयारी करत होते. त्यावेळी ते रस्त्यावरच…

Read More

मलकापुरात, उत्साहापूर्ण वातावरणात लाडक्या गणरायाला दिला निरोप

मलकापूर( दिपक इटणारे ):- ढोल ताशांच्या निनादात, आकर्षक सजावट केलेले गणपती बाप्पांचे रथ, गुलाबाच्या फुलांची उधळण करीत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात मलकापूरकरांनी आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. शहरात मंगळवारी 17 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजेपासून सर्वत्र गणरायाला निरोप देण्याची मिरवणूक निघाली होती. या मिरवणुकीमध्ये अनुचित प्रकार घडू…

Read More

गणेश मिरवणुकीसाठी पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, दंगा काबू पथक, होमगार्ड पथक अश्या 175 जणांसह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मिरवणुकीवर करडी नजर..

    मलकापूर( उमेश इटणारे ) :- दहा दिवसाआधी स्थापना झालेल्या गणरायाला आज भक्ती भावाने निरोप देण्यात येणार आहे. मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाच्या वतीने वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आली आहे. मिरवणुकीला गालबोट लागू नये यासाठी 175 पोलीस अधिकारी, पोलीस, कर्मचारी दंगा काबू पथक, होमगार्ड पथक,अश्या 175 जणांची मिरवणुकीवर करडी नजर असणार आहे. आज दुपारी…

Read More

जुन्या गावचा राजा “पार्वतीसुत भक्त गणेश मंडळातर्फे गरजू विद्यार्थ्यांना 12 सायकलिंचे वाटप,या स्तुत्य उपक्रमाचे होत आहे जनमानसात कौतुक वर्षभरात 125 सायकल वाटपाचा मंडळाचा मानस!

    मलकापूर : गणेश उत्सवाच्या माध्यमातून समाज उपयोगी उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने शहरातील पार्वतीसुत भक्त गणेश मंडळातर्फे आर्थिक दृष्ट्या दुर्बल व गरजू शालेय विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्याचा अनोखा उपक्रम राबवून १२ विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आल्या . सोबतच मंडळाचे 125 वर्ष पूर्ण झालेले असल्याने वर्षभरात १२५ सायकलींचे वाटप करण्याचा मानस मंडळातर्फे केला. मंडळ तर्फे राबविलेल्या…

Read More

ग्रामसभेत ग्रामस्थांशी अरेरावी करीत असलेल्या ग्रामसेविकेवर निलंबनाची कारवाई करा – दसरखेड ग्रामस्थांची गटविकास अधिकारी यांच्याकडे मागणी

मलकापूर: ग्रामसभेत ग्रामस्थांशी अरेरावी करीत मग्रुरीने वागणाऱ्या ग्रामसेविकेवर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी १० सप्टेंबर रोजी दसरखेड येथील संभाजी हरी पाटील सह इतर शेकडो ग्रामस्थांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. मौजे दसरखेड ग्रामपंचायत येथे ६ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायत सचिव तथा ग्रामसेविका संध्या रामा निंबोळकर यांना काही ग्रामस्थांनी काही विकास…

Read More

दोन दुचाकींचा अपघात एक जण गंभीर जखमी, मलकापूर शहरातील घटना!

मलकापूर :- मलकापूर बुलडाणा मार्गानजीक पंचमुखी येथे दोन दुचाकीचा अपघात घडला. या अपघातात पवन अवसरमोल (वय २५, रा. आंबेडकर नगर) हा तरुण गंभीर तर तीन युवक किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना काल १५ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास पंचमुखी हनुमान मंदिरानजीक घडली.या अपघातात गंभीर जखमी तरुणाला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका किंवा ऑटो मिळाला…

Read More

ज्ञानोबा – तुकाराम पुरस्कार प्राप्त रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर यांच्या सत्कार सोहळ्याच आयोजन

मलकापूर: महाराष्ट्रातील संत परंपरेमधील वारकरी संप्रदायातील जेष्ठ कीर्तनकार व गोसेवक, विदर्भ रत्न हरिभक्तिपरायण रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर यांना यावर्षीचा महाराष्ट्र शासनाच्या राज्य सांस्कृतिक कार्य संचालनानया तर्फे देण्यात येणारा मानाचा वारकरी संप्रदायातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार “ज्ञानोबा तुकाराम” सन २०२४ हा प्राप्त झालेला आहे, त्यानिमित्ताने मलकापूर, नांदुरा तालुक्याच्या वतीने समस्त वारकरी संप्रदाय मलकापूर यांच्यातर्फे महाराजांचा सत्कार समारंभ श्री…

Read More

विश्व हिंदू परिषद तर्फे सामाजिक समरसता महाआरती!

मलकापूर – विश्व हिंदू परिषद सामाजिक समरसता आयामाद्वारे शहरातील बाल गणेश मंडळ येथे सामाजिक एक्या करिता सामाजिक समरसता महाआरतीचे आयोजन दि. 14 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:30 वाजता करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी शहरातील 43 समाजा मधून 86 गणमान्य बंधू यांना सहपत्नीक या महाआरतीमध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून विश्व हिंदू परिषदेचे सामाजिक…

Read More

हिराबाई संचेती कन्या शाळेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत सुयश

मलकापूर :- 13 सप्टेंबर वार शुक्रवार रोजी तालुका क्रीडा संकुल येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हिराबाई संचेती कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी अंडर 17 आणि अंडर 19 या दोन्ही गटात उत्तम खेळाचे प्रदर्शन करून अंडर 19 मध्ये विजेतेपद आणि अंडर 17 मध्ये उपविजेते पद पटकाविले आहे. अंडर 17 या संघाची कॅप्टन…

Read More

श्री शिवाजी गणेश मंडळ बाजीप्रभू नगर व कीर्ती गणेश मंडळ, किल्ला चौक बारादरी, या दोन्ही मंडळाच्या देखाव्याने मलकापूरकरांचे वेधले लक्ष, दररोज शेकडो भाविकांची देखावे बघण्यासाठी मोठी गर्दी

मलकापूर( दिपक इटणारे ):- गणेशोत्सव म्हटलं की सगळ्यांच्याच मनामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होते. सार्वजनिक उत्सवात नवतरुण पिढीला संदेश दायक देखावे तयार करणे हाच उत्सवाचा खरा उद्देश आहे. असाच सुंदर असा देखावा मलकापूर शहरातील श्री शिवाजी गणेश मंडळ बाजीप्रभू नगर व कीर्ती गणेश मंडळ किल्ला चौक बारादारी यांनी आपल्या मंडळामध्ये उत्कृष्टरित्या सजावट करून देखावा निर्माण केला…

Read More
error: Content is protected !!