रुग्णालयाचा दरवाजा तोडून रोख रक्कम व सीसीटीव्ही कॅमेऱ्याची चोरी, सिंदखेडराजा तालुक्यातील घटना!
जांभोरा : सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा येथील राहेरी ते शेवली मार्गावर असलेल्या डॉ. शरदचंद्र देशमुख यांच्या रुग्णालयाचा दरवाजा तोडून चोरट्यांनी रोकड, सीसी कॅमेरे व इतर साहित्य लंपास केल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. जांभोरा येथे राहेरी येथील डॉ. शरदचंद्र देशमुख यांच्या मालकीचे रुग्णालय आहे. अज्ञात चोरट्याने ३० सप्टेंबरला मध्यरात्री रुग्णालयाच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत…
