साखळी फाट्याजवळ भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, चालक फरार
बुलढाणा :- बुलढाणा-चिखली मार्गावर साखळी फाट्याजवळ रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिल्यानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. महेश कडुबा लोढे (वय ३०, रा. मोहदरी, ता. मेहकर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. महेश हा भादोला येथील सासरवाडीतून…
