Headlines

मलकापूरमध्ये शिवमहिमा गूंजला! पं. विजयशंकर मेहता यांच्या शिवपुराण कथेला भक्तांचा अभूतपूर्व प्रतिसाद

  मलकापूर: मलकापूरमध्ये श्री सदविचार सेवा समितीच्या वतीने आयोजित भव्य शिवपुराण कथा अत्यंत भक्तिरसात आणि धार्मिक उत्साहात संपन्न झाली. दि. १३ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी २०२५ या सात दिवसांच्या काळात संपूर्ण मलकापूर शिवमय झाले होते. प्रसिद्ध प्रवचनकार पं. विजयशंकर मेहता यांनी आपल्या अमृतमय वाणीतून शिवमहिमेचे गूढ उलगडले आणि उपस्थित भक्तगण मंत्रमुग्ध झाले. पहिला दिवस, १३…

Read More

नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा बेजबाबदारपणा; मनमानी पद्धतीने होत आहे पाणीपुरवठा, पाणीपुरवठा करणारा बेजबाबदार कर्मचारी कॉल उचलत नसल्याने नागरिक त्रस्त..

  मलकापूर ( उमेश ईटणारे ):- शहरातील माता महाकाली नगर परिसरातील पाणीपुरवठा कर्मचाऱ्याचा बेजबाबदारपणा नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. नगरपालिकेने पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विविध भागांमध्ये कर्मचारी नियुक्त केले असले, तरी या कर्मचाऱ्याची कार्यपद्धती मनमानी व गैरजबाबदार असल्याचे स्पष्ट होत आहे. नियोजनाचा अभाव, नागरिकांना मनस्ताप शहरात सध्या दहा दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना आधीच अडचणींचा सामना…

Read More

मलकापूरात चोरट्यांचा धुमाकूळ, भरदिवसा पेट्रोल पंपाजवळ युवकाला चाकूचा धाक दाखवून सोनसाखळी लुटली.. एक अटक, एक फरार

  मलकापूर – शहरातील अबला पेट्रोल पंपाजवळ चाकूचा धाक दाखवून एका युवकाची ४० हजार रुपये किमतीची सोनसाखळी लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना २४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून, दुसरा आरोपी अद्याप फरार आहे. पुरुषोत्तम विष्णू कुटे (२२, रा. पोटा, ता. नांदुरा) हा युवक…

Read More

अगरबत्तीच्या धुरामुळे मधमाशांचा हल्ला; महिलेचा मृत्यू, पाच जखमी

  अकोला :- बार्शीटाकळी तालुक्यातील काजळेश्वर येथे शेतात पूजा करत असताना मधमाशांच्या हल्ल्यात एका महिलेला प्राण गमवावा लागला. या हल्ल्यात अन्य पाच जण जखमी झाले असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सोमवारी झालेल्या या दुर्घटनेत रेशमा पवार (वय ३०) या महिलेचा मृत्यू झाला. पूजेदरम्यान अगरबत्तीच्या धुरामुळे झाडावर असलेल्या मधमाशांच्या पोळ्याला धक्का लागला, त्यामुळे संतप्त…

Read More

जुना वाद उफाळला; दोन गटात तुफान हाणामारी, लाठ्या-काठ्या चालल्या, अमडापूर पोलीस ठाण्यात 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

  अमडापूर : उदयनगर येथे २२ फेब्रुवारी रोजी जुन्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. लाठ्या-काठ्यांसह झालेल्या या वादात अश्लील शिवीगाळही करण्यात आली. अमडापूर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परस्परविरोधी तक्रारींवरून दोन्ही गटांतील एकूण ४० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास ठाणेदार निखिल निर्मल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Read More

भर रस्त्यावर कामगाराच्या हातातील तीन लाखांहून अधिक रक्कम असलेली पिशवी हिसकावून चोरट्याचे पलायन, आसलगाव येथील घटना

  आसलगाव :- येथे एका देशी दारू दुकानातील रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या कामगाराच्या हातून अज्ञात चोरट्याने ३ लाख ३४ हजार रुपयांची पिशवी हिसकावून पलायन केले. ही घटना २१ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. बाबुराव रामभाऊ चोपडे हे गेल्या १५ वर्षांपासून गोविंद भिकारी अग्रवाल यांच्या देशी दारू दुकानातील रोकड सांभाळण्याचे व ती बँकेत भरण्याचे…

Read More

विष प्राशन केल्याने 42 वर्षीय महिलेचा मृत्यू, खामगाव तालुक्यातील घटना!

  खामगाव (प्रतिनिधी) – हिंगणा उमरा (ता. खामगाव) येथील एका ४२ वर्षीय महिलेने विष प्राशन केल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रजनी विजय जुमडे यांनी २० फेब्रुवारी रोजी अज्ञात कारणाने विष सेवन केले. प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या…

Read More

बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने गळ्यातील मंगळसूत्र लांबविले.. बुलढाणा बस स्थानकावरील घटना!

  बुलढाणा: शहरातील बसस्थानकावर दुपारच्या सुमारास गर्दीचा फायदा घेत अज्ञाताने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती सुधाकर कांबळे (वय ५१, रा. फॉरेस्ट कॉलनी, बुलढाणा) या शनिवारी, २१ फेब्रुवारी रोजी आपल्या मुलाकडे संभाजीनगर येथे जाण्यासाठी बुलढाणा बसस्थानकावर आल्या होत्या….

Read More

शेतातून 40 कट्टे हरभरा चोरी, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल, शेगाव तालुक्यातील घटना

  शेगाव – तालुक्यातील भोनगाव येथे अज्ञात चोरट्यांनी शेतातून तब्बल ४० कट्टे हरभरा लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भोनगाव येथील शेतकरी राजेश विलासराव शेळके (वय ४९) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या माहितीनुसार, गट क्रमांक ५३६ व ५३७ मधील शेतात रब्बी हंगामासाठी हरभऱ्याची लागवड करण्यात आली होती. २१ फेब्रुवारी रोजी…

Read More

वजन काट्यावरून वाद, धान्य विक्रेत्यास मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल, शेगाव येथील घटना!

  शेगाव – वजन काटा चुकीचा असल्याच्या आरोपावरून वाद उफाळल्याने एका धान्य विक्रेत्यास मारहाण केल्याची घटना २२ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे घडली. या प्रकरणी लखपती गल्ली, अग्रसेन चौक येथे राहणारे धान्य विक्रेते आकाश जेठाराम पालीवाल (वय २७) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, आरोपी संकेत देशमुख, पंकज आणि विकी…

Read More
error: Content is protected !!