Headlines

गिरोली शिवारात बांधावरील वाद पेटला; दोन्ही गटांमध्ये हाणामारी.. परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल!

खामगाव : – गिरोली शिवारातील शेताच्या बांधावरून सुरू झालेला वाद दोन्ही गटांत मारहाणीपर्यंत गेला असून, या प्रकरणात उत्तम राठोड व संजय चव्हाण या दोघांनी एकमेकांविरुद्ध पिंपळगाव राजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना १ जून रोजी घडली. उत्तम मंगो राठोड (५५) यांच्या फिर्यादीनुसार, ते व त्यांच्या पत्नी शेतात असताना दीपक चव्हाण, संजय चव्हाण,…

Read More

शेतात काम करतांना शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू; खामगाव तालुक्यातील उमरा अटाळीतील घटना!

खामगाव:- खामगाव तालुक्यातील उमरा अटाळी येथे शेतात काम करत असताना विजेचा शॉक लागून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २ मे रोजी सकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. राजेंद्र महादेव राऊत (वय ५०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते रोजच्या प्रमाणे सकाळी आपल्या शेतात गेले होते. शेतातील विहिरीजवळ वाढलेले गवत कापत असताना…

Read More

आईच्या अश्रूंना शेवटी मुलाने दिलं उत्तर; दारुड्या पित्याच्या अमानुष त्रासाचा घेतला जीवघेणा बदला, खामगाव तालुक्यातील घटना!

खामगाव : – ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) “आई रोज रडायची… बापाच्या शिव्या-माराच्या धिंगाण्याला कंटाळून तिने खूपदा जग सोडायची तयारी केली होती… पण एकुलत्या एक मुलाने तिचे अश्रू पाहिले आणि शेवटी वडिलांचाच जीव घेतला.” लोणी गुरव (ता. खामगाव) येथे २९ एप्रिलच्या रात्री घडलेली ही धक्कादायक घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. गोरख धोंडोपंत हिवराळे…

Read More

मुरूम उत्खननादरम्यान आग लागून जेसीबी मशीन जळून खाक; पिंप्री देशमुख शिवारातील घटना; शॉर्टसर्किटची शक्यता

खामगाव – तालुक्यातील पिंप्री देशमुख शिवारात मुरूम उत्खननाच्या कामादरम्यान जेसीबी मशीनला अचानक आग लागून संपूर्ण मशीन जळून खाक झाल्याची घटना ८ एप्रिल रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. शंकर होनाळे यांच्या मालकीची ही जेसीबी मशीन मुरूम काढण्याचे काम करत होती. उत्खनन सुरू असतानाच मशीनने अचानक पेट घेतला. काही क्षणातच संपूर्ण मशीन आगीच्या भक्षस्थानी पडले. घटनेची माहिती…

Read More

खरबुज चोरीप्रकरणी दोघांना अटक ढोरपगाव शिवारातील घटना; चोरट्यांकडून ८ हजारांचे खरबुज व दुचाकी जप्त

पिंपळगाव राजा : ढोरपगाव शिवारात खरबुज चोरीसाठी आलेल्या दोघा चोरट्यांना शेतकऱ्यांनी रंगेहात पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणात पोलिसांनी चोरट्यांकडून सुमारे ८ हजार रुपये किमतीचे १५० ते १६० किलो खरबुज आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. ४ एप्रिलच्या रात्री ही घटना घडली. आरोपी अमन दीपक लोखंडे आणि प्रेम दादाराव इंगळे, दोघेही रा. भालेगाव बाजार,…

Read More

खामगाव बसस्टॉप वर ४७ हजारांची रोकडं चोरी; आरोपी २४ तासांत गजाआड, ४५ हजारांची रोकड जप्त! खामगाव पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

खामगाव : – खामगाव एसटी बसस्थानकावर एका ज्येष्ठ प्रवाशाच्या खिशातून ४७ हजार रुपयांची रोकड असलेले पाकीट चोरल्याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याजवळून ४५ हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. ही घटना ४ एप्रिल रोजी दुपारी घडली. मोताळा तालुक्यातील जयपूर कोथळी येथील ८२ वर्षीय वासुदेव दत्तात्रय कुलकर्णी हे खामगाव बसस्थानकावरून आपल्या गावी…

Read More

गळफास घेवून वृध्दाची आत्महत्या; खामगाव तालुक्यातील वाडी येथील घटना!

  खामगाव : तालुक्यातील वाडी येथे वृध्दाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ५ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गणेश वसंतराव सुर्यवंशी वय ३९ वर्षे रा. सप्तशृंगीनगर वाडी यांनी शहर पोस्टेला तक्रार दिली की, त्यांच्या पत्नीने फोन करुन सांगितले की, तुमच्या वडिलांनी लोखंडी खिडकीचे ग्रीलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून…

Read More

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिला पळविली; शारीरिक अत्याचार आणि मारहाणीचा महिलेचा आरोप; गुन्हा दाखल; खामगाव येथील घटना

खामगाव: तालुक्यातील २१ वर्षीय महिलेला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत जबरदस्तीने पळवून नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १ जानेवारी ते १ एप्रिल २०२५ या कालावधीत घडल्याचे पीडितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. तक्रारदार महिलेने ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, तिचे घटस्फोटाचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून तिचा…

Read More

अल्पवयीन मुलीच्या बालविवाह प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल; आरोपींमध्ये मलकापूरचे दोन तर खामगावच्या तीन जणांचा समावेश

खामगाव :- शहर पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा विवाह लावून तिला गर्भवती केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस तपासानुसार, मलकापूर येथील १७ वर्षे ११ महिने वयाच्या पीडितेचा बालविवाह अजय मेंडे (२५, रा. मलकापूर) याच्यासोबत घडवून आणला. १९ मे २०२४ ते १ एप्रिल २०२५ या कालावधीत हा प्रकार घडला. विवाहानंतर अत्याचार झाल्यामुळे मुलगी गर्भवती झाली आणि…

Read More

“म्हणे माझ्याशी लग्न कर, नाहीतर लग्नच होऊ देणार नाही; गुन्हा दाखल, खामगाव येथील घटना

खामगाव : एका तरुणीने मैत्री तोडल्यानंतरही तिचा पाठलाग करत तिला लग्नासाठी जबरदस्ती करणाऱ्या युवकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुटाळा खु. येथे राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीची गणेश गजानन कुन्हाडे (रा. खातखेड, ता. नांदुरा) याच्यासोबत मैत्री होती. मात्र, तरुणीने काही कारणास्तव त्याच्याशी संबंध तोडले. तरीही गणेश तिला वारंवार त्रास देत होता. रविवारी त्याने तरुणीच्या घरासमोर येऊन…

Read More
error: Content is protected !!