स्पार्किंगमुळे भीषण आग – घर, गोठा जळून खाक; दोन गायी जखमी, वीस कबुतरे मृत – ट्रॅक्टरसह लाखोंचे नुकसान
मलकापूर – हिंगणा काजी येथे महावितरणच्या डीपीवरील शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून एक घर, जनावरांचा गोठा आणि ट्रॅक्टर जळून खाक झाले. आगीत दोन गायी होरपळून जखमी झाल्या असून, वीस कबुतरे मृत्युमुखी पडली. ही घटना 19 एप्रिल रोनी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. शॉर्टसर्किटमुळे डीपीवरून ठिणग्या उडाल्या व जवळील वाळलेल्या गवताला आग लागली. ही आग रमेश रायबान…
