मलकापूरातील एका नामांकित इंग्लिश शाळेतील “दारूड्या गुरुजींची मस्ती जिरली! नागरिकांनी दारुड्या शिक्षकाला चांगलाच चोपला”! कोण तो दारुड्या गुरुजी वाचा बातमी

मलकापूर ( दिपक इटणारे ) :”शिक्षक हा समाजाचा शिल्पकार असतो” असं म्हणतात. पण शिल्पकारच जर मातीमोल निघाला, तर शिल्प कसं घडणार? असं म्हणावं लागेल, कारण मलकापूरातील एका नामांकित इंग्लिश शाळेतील शिक्षकाने केलेली संतापजनक कृत्ये आता शहरभर चर्चेत आहेत. बुलढाणा रोडलगत असलेल्या एका प्रतिष्ठित इंग्लिश शाळेत ( शाळेची बदनामी होऊ नये त्या करिता शाळेचे नाव वगळण्यात…

Read More

गौरी बुडूकलेचा राष्ट्रीय पातळीवर पराक्रम; तलवारबाजी स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई

मलकापूर 🙁 विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूरच्या उभरत्या तलवारबाज खेळाडू गौरी बुडूकले हिने राष्ट्रीय स्तरावर मोठं यश संपादन करत बुलढाणा जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे. इंफाल (मणिपूर) येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत तिने द्वितीय क्रमांक पटकावत रौप्य पदकावर आपली मोहोर उमटवली. गौरी ही जळगाव जामोद कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून,…

Read More

नशिराबाद पोलिसांची मलकापुर सोने चोरी प्रकरणात अप्पर पोलीस अधीक्षक म्हणाले चौकशी करून कारवाही करू

मलकापूर:- “चोरी केली की वेशीवर नाच” असं म्हणतात; पण मलकापूरातील या प्रकरणात मात्र चोर आणि विकत घेणारा – दोघांवरही समान कारवाई झाली नाही. उलट ज्यांनी चोरीचे सोने विकत घेतले त्यांच्यावर कुठलीच तात्काळ कारवाई न करता पोलिसांनी तो विषय पातळ केल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे ही संपूर्ण कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून “जेथे पैसा तिथे गंडासा…

Read More

भाडगणी ग्रामपंचायतीकडे गावकऱ्यांचे निवेदन; रस्ता दुरुस्ती व जनावरे हटविण्याची मागणी

मलकापूर ( विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) : भाडगणी गावातील बसस्टँड ते अविनाश जाधव यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता अत्यंत खराब झाल्याने नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे तातडीने रस्ता दुरुस्त करण्याचे निवेदन दिले आहे. एकनाथ जाधव व समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने हे निवेदन सादर करण्यात आले. सदर रस्त्यावर काही ठिकाणी जनावरे व म्हशी बांधल्यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास…

Read More

मलकापूरात “लक्ष्मीसमोर नतमस्तक नशिराबाद पोलिस? – ज्वेलर्सवर कारवाईला हात आखडता; “कायद्याचं पालन सर्वांसाठी की फक्त गरीबांसाठी? नशिराबाद पोलिसांची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात

मलकापूर ( दिपक इटणारे ) – शहरात काल दुपारी नशिराबाद पोलिसांनी चोरीच्या सोन्याच्या दागिन्यांच्या तपासासाठी धडक कारवाई केली. मात्र, या कारवाईनंतर पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आरोपींनी चोरीचे दागिने विकल्याचे कबूल केलेल्या ज्वेलर्सवर कोणतीही कारवाई न झाल्याने संशय अधिकच गडद झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीत एका महिला आणि पुरुषाने सोन्याचे…

Read More

“नशिराबाद पोलिसांची मलकापूरात धडक; कारवाईत ‘लक्ष्मी दर्शन’ झाल्याची चर्चा!”“चोर पकडला, सोने जप्त झाले; पण विकत घेणारा मोकळाच? पोलिसांची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात

मलकापूर:- शहरात आज दुपारी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. नशिराबाद पोलिसांनी चोरीच्या सोन्याच्या दागिन्यांच्या तपासासाठी मलकापूरात धडक कारवाई केली. मात्र, ही कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण, जेथे आरोपींनी चोरीचे दागिने विकले त्या ज्वेलर्सवर कारवाई न करता पोलिसांनी तो विषय पातळ करून टाकल्याची चर्चा शहरात जोर धरू लागली आहे. “चोरी केली की वेशीवर नाच” असं…

Read More

स्वतःचा चेहरा काळा, आरशावर फोडतोय राग; “बुडाला आग आणि ओरडतो दुसऱ्यावर, एका पोलीस कर्मचाऱ्याची निर्लज्ज टीका!” स्वतःच्या काळ्या धंद्याचं झाकपाक करत दुसऱ्यांवरच तोंडसुख! असं नका करत जाऊ ना साहेब!

मलकापूर : ज्याचं काम त्यानेच नाय केलं, उलट शहाणपणा शिकवायला निघाला! वाकोडी ग्रामपंचायतीत अवैध रेती वाहतुकीविरोधात आवाज उठवणाऱ्या युवकाने पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केल्यावर गावात खळबळ उडाली. पण खळबळीत खरं उघडं पडलं ते एका पोलीस कर्मचाऱ्याच्या बडबडीमुळे! हे साहेब आहेत सरकारी नोकरीत, पण वागणं मात्र गल्लीतील आगाऊ पोरांसारखं! गावकरी जीव धोक्यात घालून अन्यायाविरुद्ध उभे…

Read More

गुरूची कृपा परमेश्वरासम समान… ज्ञानविना जीवन अंधारमय… गुरू हा दीपस्तंभ… तोच खऱ्या अर्थानं जीवनदिशा दाखवणारा! नूतन इंग्लिश स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

मलकापूर : “तुजविण न मिळे ज्ञान, ज्ञानविण जगी न होई सन्मान” या ओळींप्रमाणे गुरुंच्या महत्त्वाची जाणीव करून देणारा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम स्थानिक नूतन इंग्लिश स्कूलमध्ये अत्यंत उत्साह, भक्तिभाव आणि शिस्तबद्धतेने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानाची देवता सरस्वतीमातेच्या पूजनाने झाली. हे पूजन शाळेचे प्राचार्य सुरेश खर्चे सर यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेच्या अनुषंगाने आपले…

Read More

श्रीमती. व्ही. एस. रायपुरे इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये मोफत पुस्तक वाटपाचा कार्यक्रम उत्साहात साजर

  मलकापूर : – स्थानिक हरसोडा येथील श्रीमती. व्ही. एस. रायपुरे इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये दिनांक ५ जुलै २०२५ वार शनिवारला नवीन शैक्षणिक वर्ष आरंभ निमित्त मोफत पुस्तक वाटपाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये स्कूल व कॉलेजचे सर्व विद्यार्थी यांना नवीन शैक्षणिक वर्ष 2025 – 26 च्या अभ्यासक्रमासाठी व्यवस्थापनाकडून सर्व विषयांची पुस्तके मोफत…

Read More

नूतन इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

  मलकापूर : – स्थानिक नूतन इंग्लिश स्कूलमध्ये दिनांक ५ जुलै 2025 वार शनिवारला “आषाढी एकादशी निमित्त” दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.वारकरी संप्रदायांच्या वेशभूशेत आलेले विद्यार्थी विद्यार्थ्यांनी संपूर्ण परिसर विठ्ठल नामाचा गजरामध्ये दुमदुमला. प्रथमता विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्ती व प्रतिमेचे पूजन शाळेचे प्राचार्य श्री. एस एस खर्चे सर, नूतन विद्यालयाचे प्राचार्य बोरले सर, प्राथमिक…

Read More
error: Content is protected !!