
हराळखेड शिवारात बिबट्या मृतावस्थेत आढळला; नैसर्गिक मृत्यूची शक्यता!
इसोली :- बुलढाणा वनपरिक्षेत्रातील उदयनगर वर्तुळातील हराळखेड येथील एका शेतातील नाल्याजवळ ७ जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता तीन ते चार वर्षांचा नर जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. इसोली येथील रहिवासी शेख रईस शेख मोती यांनी गट क्रमांक ८६ मध्ये बिबट्या मृत असल्याची माहिती वनविभागाला दिली. या माहितीनंतर वनाधिकारी, अमडापूरचे पशुधन विकास अधिकारी व्ही.बी. आवटे आणि…