Headlines

बिबट्याचा थरार वाढतोय! आता मलकापूर तालुक्यातील आळंद शेत शिवारात दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचा कळस; व्हिडीओ व्हायरल

मलकापूर ( दिपक इटणारे ) –”काल विष्णूनगर, आज आळंद… उद्या कुठे?” शेतकऱ्यांचे डोळे झोपेच्या आधी आकाशाकडे, आणि पाय मातीतल्या कपाटाकडे – कारण रात्री कुठून हल्ला होईल, याची खात्री उरलेली नाही… विष्णूनगर शिवारातील बिबट्याच्या थरारक हल्ल्याची चर्चा थांबायच्या आतच तोच बिबट्या आता मलकापूर तालुक्यातील आळंद शेत शिवारात दिसल्याने खळबळ उडाली आहे. या बिबट्याचे अस्तित्व पुन्हा एकदा…

Read More

मलकापुरात बिबट्याचा कहर! एका जनावराचा शेत शिवारात पाडला फळश्या; परिसरात भीतीचं वातावरण; व्हिडीओ व्हायरल

मलकापूर  –”शेतात पिकं नाही, तर आता सुरक्षितताही नाही… रात्रीच्या अंधारात गोंधळलेल्या जनावरांच्या किंकाळ्यांमुळे शेतात काम करणाऱ्यांचं काळीज हादरून गेलं!”        मलकापूर शहरालगत असलेल्या विष्णूनगर शिवारातील एका शेतात सोमवारी मध्यरात्री हृदयद्रावक घटना घडली. अतुल पाटील (मालक – अन्नपूर्णा हॉटेल) यांच्या शेतात बिबट्याने अचानक प्रवेश करत रोही जातीच्या जनावरावर हल्ला चढवला. या झपाट्याने झालेल्या हल्ल्यात…

Read More

“एका निष्काळजी उपचाराने भविष्य अंधारले…”दुर्गेश भारंबेच्या उपचारप्रकरणी अखेर एक वर्षानंतर डॉ. राहुल चोपडेंविरुद्ध गुन्हा दाखल; शिवसेना उबाठाच्या पाठपुराव्याला यश

मलकापूर 🙁 विदर्भ लाईव्ह वृत्तसेवा ) “मुलगा एका अपघातातून वाचला होता… पण डॉक्टरांच्या चुकीने त्याचा पाय कायमचा गमावला!” अशा शब्दांत दुःख व्यक्त करणाऱ्या पूनम भारंबे यांचा आवाज आज न्यायाच्या दिशेने पोहोचला आहे. अपघातानंतर उपचारासाठी नेण्यात आलेल्या त्यांच्या २० वर्षीय मुलावर डॉ. राहुल चोपडे यांनी दाखवलेली बेफिकिरी अखेर गुन्हेगारी चौकशेच्या टप्प्यावर पोहोचली आहे. या बाबत सविस्तर…

Read More

पायी गस्ती घालत असतांना सर्वसामान्यावर कारवाई ची नजर; मात्र खाजगी बस चालकांपुढे, आज शहरात पायी गस्त घालत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने नांग्या टाकत केले दुर्लक्ष; हे असे कसे दुटप्पी धोरण साहेब तुमचे….

मलकापूर ( दिपक इटणारे ) – शहराच्या सुरक्षेसाठी सुरू असलेल्या पोलीस गस्तीमधून खरंतर नागरिकांना दिलासा मिळायला हवा होता. मात्र आज बुलढाणा रोडवर गस्त घालणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने जे वागणे दाखवले, त्यावरून हे स्पष्ट झाले की गस्तीच्या नावाखाली केवळ सामान्यांवर धाक दाखवायचा आणि मोठ्यांपुढे गुपचूप नतमस्तक व्हायचं, हाच खरा हेतू आहे काय? गस्तीच्या वेळी एका दुकानासमोर…

Read More

दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराच्या कारवाईचे समर्थन – भाजप मंत्री विजय शहा यांच्यावर कारवाईची मागणी काँग्रेसतर्फे राष्ट्रपतींना निवेदन सादर; आंदोलनाचा इशारा

मलकापूर –भारतीय लष्कराने अलीकडेच जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईचे देशभरात कौतुक होत असताना, या मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या शूर महिला अधिकारी लेफ्टिनेंट सोफिया कुरैशी यांच्याविरोधात केलेल्या बेताल वक्तव्याचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने तीव्र निषेध केला आहे. मध्यप्रदेशचे भाजप मंत्री विजय शहा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेसने राष्ट्रपतींना निवेदन सादर…

Read More

पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. रामकांत चौधरी यांना “ऑनर लेटर 2025” सन्मान

  मलकापूर: – पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय, मलकापूर येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रभारी प्रा. रामकांत चौधरी यांना “ऑनर लेटर 2025” या मानाच्या सन्मानाने गौरविण्यात आले आहे. धरणगाव येथील करुणा बुद्ध विहार संस्थेच्या वतीने आयोजित भव्य कार्यक्रमात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकालीन व समर्पित योगदानाची…

Read More

प्रा. मनीष मानकर सर यांना राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद सन्मान कर्तृत्वाचा पुरस्कार जाहीर

मलकापूर– पश्चिम विदर्भात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी दिला जाणारा राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद सन्मान कर्तृत्वाचा पुरस्कार २०२५ यंदा प्रा. मनीष मानकर यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन मार्फत दिला जात असून, संस्थेच्या विकास आणि संशोधन समितीने त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची निवड केली आहे. या…

Read More

४२ वर्षीय महिलेवर बलात्कार; आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल; मलकापूर तालुक्यातील खळबळजनक घटना!

  मलकापूर: – ४२ वर्षीय महिलेसोबत बलात्कार केल्याप्रकरणी सागर किसन मोरे (रा. वाकोडी) याच्याविरुद्ध मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. १३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता पीडित महिला नदीकाठी असलेल्या शौचालयात गेली असताना आरोपी तिच्याजवळ आला. त्याने महिलेसोबत लग्न करण्याचा आग्रह केला. महिलेनं…

Read More

शैक्षणिक क्षेत्रात चांगल्या गुणवत्तेचा वारसा जपणाऱ्या चांडक विद्यालयाचा निकाल पुन्हा एकदा तेजस्वी; चांडक विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

मलकापूर:- नगर सेवा समितीद्वारा संचालित लीलाधर भोजराज चांडक विद्यालयाने शैक्षणिक गुणवत्तेचा वारसा जपत पुन्हा एकदा आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. गुणवत्ता, शिस्त आणि सातत्य यांवर भर देणाऱ्या या संस्थेने यंदाच्या निकालात 96 टक्के यशप्राप्ती मिळवत परीक्षाफलात आपली छाप उमटवली आहे. या वर्षी विद्यालयाचा एकूण निकाल 96 टक्के लागला असून प्रविण्याश्रेणीत 122 विद्यार्थी,…

Read More

मलकापूर तालुक्याचा दहावीचा निकाल ९३.८६ टक्के; तालुक्यातील चार विद्यालयांचा निकाल शंभर टक्के

मलकापूर:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल आज १३ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. मलकापूर तालुक्याचा निकाल ९३.८६ टक्के लागला असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी एन. जे. फाळके यांनी दिली. तालुक्यातील विविध शाळांचा निकाल पुढीलप्रमाणे आहे ग्रामीण विकास विद्यालय बेलाड – १००% भारत भारती कॉन्व्हेंट – १००%…

Read More
error: Content is protected !!